अ. भा. महात्मा फुले समता परिषदेतर्फे अमरावती विभागात प्रबोधन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST2021-09-26T04:45:27+5:302021-09-26T04:45:27+5:30

वाशिम - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे अमरावती विभागात प्रबोधन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे ...

A. Bha. Prabodhan Shibir in Amravati Division by Mahatma Phule Samata Parishad | अ. भा. महात्मा फुले समता परिषदेतर्फे अमरावती विभागात प्रबोधन शिबिर

अ. भा. महात्मा फुले समता परिषदेतर्फे अमरावती विभागात प्रबोधन शिबिर

वाशिम - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे अमरावती विभागात प्रबोधन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे . हे शिबिर २५ सप्टेंबर शेगाव येथून सुरू झाले असून २६ व २७ सप्टेंबरला दारव्हा व अमरावती येथे अनुक्रमे हाेणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे यांनी दिली.

या शिबिरात ज्येष्ठ विचारवंत व लेखक प्रा हरी नरके , ज्येष्ठ विचारवंत व लेखक उत्तम कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. २६ सप्प्टेंबर राेजी दारव्हा येथील निधी मंगल कार्यालय, २७ ला अमरावती येथील बाबासाहेब वऱ्हाडे मंगल कार्यालय येथे हाेणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस, रवी सोनवणे, प्रदेश महासचिव तुकाराम बिडकर, विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष सुभाष राऊत, विभागीय संघटक गजानन इंगळे , प्रदेश सचिव डॉ. गणेश खारकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. बाबूराव बेलसरे, वाशिम जिल्हा सचिव विठ्ठल भागवत आदी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांतील समता परिषदेचे सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, महानगर अध्यक्ष तसेच निमंत्रित पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे व प्रभाकर वानखेडे यांनी कळविले आहे.

Web Title: A. Bha. Prabodhan Shibir in Amravati Division by Mahatma Phule Samata Parishad