सावधान, कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती ही खालावते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:15+5:302021-08-27T04:44:15+5:30

.................... किमान आठ तास झोप आवश्यक किमान आठ तास झोपेची गरज प्रत्येकच व्यक्तीला आवश्यक आहे. पुरेशी झोप झाली तरच ...

Beware, lack of sleep also lowers immunity! | सावधान, कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती ही खालावते !

सावधान, कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती ही खालावते !

....................

किमान आठ तास झोप आवश्यक

किमान आठ तास झोपेची गरज प्रत्येकच व्यक्तीला आवश्यक आहे. पुरेशी झोप झाली तरच मेंदूला अपेक्षित आराम मिळतो आणि तो पूर्ण क्षमतेने कार्य करू शकतो. पुरेशी झोप न झाल्यास शारीरिक थकवा आणि डोळ्यांचे विकार उद्भवू शकतात.

...............

वयोगटानुसार किमान झोपेचे तास

०-३ महिने - १४-१७

४-११ महिने - ११-१५ तास

१-२ वर्षे - ११-१४

३-५ वर्षे - १०-१३

६-१३ वर्षे - ९-११

१४-१७ वर्षे - ९-११

१८-६४ वर्षे - ८-९

६५ वर्षांपुढे ७-८

.................

अपुऱ्या झोपेचे तोटे

१) पुरेशी झोप न झाल्यास हृदयविकार, रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, नैराश्य येणे आदी स्वरूपातील व्याधी जडू शकतात.

२) अपुरी झोप, व्यायामाकडे दुर्लक्ष आदींमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.

३) दिवसभराच्या कामातून येणारा तणाव दूर करण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे अत्यंत महत्वपूर्ण आहे.

..............

रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीराची ढाल

कोणत्याही रोगास प्रतिकार करण्यासाठी प्रतिकारशक्ती दांडगी असणे आवश्यक आहे. ही शक्ती योग्य प्रमाणात असल्यास व्यक्ती आजारी पडत नाही किंवा आजारी पडला तरी त्यातून लवकर बरा होतो. दैनंदिन आहार आणि जीवनशैलीत काही बदल करून रोगप्रतिकारशक्ती वाढविता येणे सहज शक्य आहे.

.................

संतुलित आहार आणि व्यायाम ही आवश्यक

शारीरिक स्वास्थ्य सदैव चांगले राहण्याकरिता संतुलित आहार आणि दैनंदिन व्यायाम, योगासन, प्राणायामची सवय असणे आवश्यक आहे. संतुलित आहार आणि व्यायामामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून दूर राहणे शक्य होते.

.............

सध्या प्रत्येकजण धावपळीचे आयुष्य जगत आहे. दिवसभरातील कामाच्या ताणामुळे विविध आजार वाढीस लागले आहेत. त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी वयोगटानुसार किमान झोप घेणे आवश्यक आहे. सोबतच संतुलित आहार आणि व्यायामाची सवय देखील अत्यंत गरजेची ठरत आहे.

- डाॅ. हरीश बाहेती

Web Title: Beware, lack of sleep also lowers immunity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.