बेटी बचाओ, बेटी पढाओ ही काळाची गरजच
By Admin | Updated: February 14, 2015 02:01 IST2015-02-14T02:01:26+5:302015-02-14T02:01:26+5:30
‘लोकमत’ परिचर्चेतील सूर; स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याची नितांत गरज.
_ns.jpg)
बेटी बचाओ, बेटी पढाओ ही काळाची गरजच
कारंजा (जि. वाशिम) : देशात मुलाच्या संख्येच्या प्रमाणात मुलींच्या संख्येत घट होत आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने देशभरात स्त्री भ्रूणहत्येविरोधातील बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहिम राबविण्यात येत असून, या मोहिमेबाबत परिचर्चेच्या माध्यमातून जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न ह्यलोकमतह्णच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. स्त्रीयांची स्थिती सुधारण्यासाठी फायदेशीर ठरणारी ही मोहीम निश्चितच स्वागतार्ह असल्याचा निष्कर्ष त्यामधून निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणा येथे २३ जानेवारीला ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. देशातील दर हजारी मुलांमागे मुलींच्या जननसंख्येत वाढ व्हावी, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार १९७१ मध्ये भारतात हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९६४ होते, तर २0११मध्ये हेच प्रमाण ९१८वर पोहोचले. २00१ ते २0११ या दरम्यान हे प्रमाण देशातील अनेक जिल्ह्यांत खाली आलेले दिसले. ब्रिटिश मेडिकल र्जनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार १९८0 ते २0११ या दरम्यानच्या काळात भारतात एक कोटी २0 लाख मुलींची गर्भातच हत्या करण्यात आली. पंचायत समिती सभापती वर्षाताई नेमाणे, जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्षा सविता मोरे, उपाध्यक्ष मंजुशा पिंपळशेंडे, प्रया बाणगांवकर परिचर्चेत सहभागी झाल्या होत्या. ही मोहिम राबविताना जनतेकडून योग्य सहकार्य लाभणे अपेक्षित आहे, तसेच शासनानेही ही मोहिम राबविताना थोडी ताठर भूमिका घ्यायला हवी. असे मत मान्यवर महिलांकडून लोकमतच्या परिचर्चेत व्यक्त करण्यात आले.