लाभार्थींना शौचालय अनुदान मिळणार!

By Admin | Updated: March 28, 2016 02:25 IST2016-03-28T02:25:20+5:302016-03-28T02:25:20+5:30

मानोरा शहरातील लाभार्थी; २४ लाखांची तरतूद; स्वच्छता विभागाची हिरवी झेंडी.

Beneficiaries will get toilet grant | लाभार्थींना शौचालय अनुदान मिळणार!

लाभार्थींना शौचालय अनुदान मिळणार!

वाशिम: नगर पंचायत स्थापनेपूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण करणार्‍या मानोर्‍यातील २00 लाभार्थींच्या अनुदानाचा तिढा संपला असून, जिल्हा परिषदेकडून २00 लाभार्थींना २४ लाखांचे अनुदान दिले जाणार आहे.
स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. निर्मल भारत अभियान आता स्वच्छ भारत मिशन म्हणून नावलौकिकास आले आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट टाकण्यात आली आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्वच्छता अभियान कक्षाच्या वतीने घरोघरी शौचालय बांधकाम करण्याचा नारा दिला जात आहे. शौचालय बांधकाम पूर्ण करणार्‍या लाभार्थीला १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. मानोरा ग्रामपंचायत असताना शहरातील २00 लाभार्थींनी शौचालय बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर मानोरा नगर पंचायत अस्तित्वात आली. दरम्यान, शौचालय अनुदानाची रक्कम कुणी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला. नगर पंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याने अनुदानाची रक्कम जिल्हा परिषद प्रशासनाने द्यावी, अशी भूमिका नगर पंचायत प्रशासनाने घेतली. जिल्हा परिषद सदस्य तथा भारिप-बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्रमंडळ आघाडीचे प्रमुख हेमेंद्र ठाकरे यांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. मानोरा ग्रामपंचायत असताना शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याने २00 लाभार्थींचे प्रत्येकी १२ हजार अनुदान याप्रमाणे २४ लाख रुपये जिल्हा परिषदेने द्यावे, अशी भूमिका हेमेंद्र ठाकरे यांनी जिल्हा परिषद सभागृहात मांडली. अखेर जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने मानोर्‍यातील २00 लाभार्थींना अनुदान देण्याची मागणी मान्य करून, तसे पत्र हेमेंद्र ठाकरे यांना सुपूर्द केले. यामुळे २00 लाभार्थींच्या अनुदानाचा तिढा सुटला असून, लवकरच अनुदान मिळणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य ठाकरे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.

Web Title: Beneficiaries will get toilet grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.