शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

मंगरुळपीर तालुक्यात अनुदानाअभावी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींची परवड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:47 PM

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यात शासनाच्या श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थींना गत चार महिन्यांपासून अनुदानच मिळालेले नाही.

ठळक मुद्दे६५ व ६५ वर्षावरील व व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून ४०० प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते. गत चार महिन्यांपासून मंगरुळपीर तालुक्यातील श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थीना अनुदानच मिळालेले नाही. त्यामुळे या वृद्ध निराधारांवर दुष्काळी स्थितीत उपासमारीची पाळी आली आहे.

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यात शासनाच्या श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थींना गत चार महिन्यांपासून अनुदानच मिळालेले नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी वृद्धांची दुष्काळी स्थितीत मोठी परवड सुरू असून, वृद्ध महिला, पुरुष वारंवार अनुदानासाठी बँकांच्या वाºया करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाºया ६५ व ६५ वर्षावरील व व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून ४०० प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते. याच लाभाथ्यार्ला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे २०० रुपये प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ४०० आणि केंद्र शासनाचे २०० रुपये मिळून प्रती महिना ६०० रुपये  प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळते. याच योजनेतील गट (ब)अंतंर्गत ज्या व्यक्तीचे वय ६५ व ६५ वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांच्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये ६०० प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते. शासनाच्यावतीने देण्यात येणारे हे अनुदान आता थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होत असले तरी, अद्यापही अनेक लाभार्थींचे खाते व आधार क्रमांक शासनाकडे प्राप्त न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने तहसील कार्यालयांद्वारे अशा लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत जमा करण्यात येत आहे. तथापि, गत चार महिन्यांपासून मंगरुळपीर तालुक्यातील श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थीना अनुदानच मिळालेले नाही. तालुक्यात या योजनेच्या लाभार्थींची संख्या ९ हजार ८५६ आहे. या सर्व लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर अदा करण्यात येते; परंतु एकूण १७ हजार निराधारांपैकी श्रावण बाळ योजनेच्या ९८५६ लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कमच चार महिन्यांपासून बँकांत जमा झाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांची मोठी परवड होत असून, दरदिवशी शेकडो लाभार्थी ब्विविध बँका आणि तहसील कार्यालयात अनुदानासाठी चकरा मारत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  रखरखत्या उन्हात हे वृद्ध लाभार्थी शासनाच्या अनुदानासाठी वारंवार अधिकाºयांकडे चौकशी करीत असताना त्यांचे समाधान करण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यामुळे या वृद्ध निराधारांवर दुष्काळी स्थितीत उपासमारीची पाळी आली आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर