शौचालयाच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित 

By Admin | Updated: April 17, 2017 16:41 IST2017-04-17T16:41:40+5:302017-04-17T16:41:40+5:30

म्हसणी येथील सेवानिवृत्त कर्मचाºयाला स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधूनही अनुदान मिळाले नाही.

Beneficiaries deprived of toilets subsidy | शौचालयाच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित 

शौचालयाच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित 

इंझोरी (वाशिम) : म्हसणी येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधूनही अनुदान मिळाले नसून, आपणास अनुदान मिळणार नसल्याचे ग्रामसेविकेकडून त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी गोविंद मुराळे यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी वाशिम व मानोराच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे न्याय देण्याची मागणी केली. 
म्हसणी येथील काही लाभार्थींनी अनुदानासाठी अर्ज सादर करुन शौचालय बांधकाम केले. त्यांना अनुदान देण्यात आले. यामध्ये गोविंदा मुराळे, बबन टिके व रामलाल या शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. त्यामधील गोविंदा मुराळे वगळता इतरांना शौचालयाचे अनुदानही देण्यात आले; परंतु गोविंदा मुराळे यांनी शौचालय बांधकामाच्या अनुदानासाठी ग्रामसेवकाकडे अर्ज सादर केला असता तुम्ही शासकीय कर्मचारी असून, आॅनलाईन यादीत आपल्या नावापुढे ह्ययसह्ण अर्थात आपल्याकडे शौचालय पूर्वीच असल्याचे नमूद असल्यामुळे आपणास अनुदान देता येत नाही, असे ग्रामसेविकेकडून सांगण्यात आले.

यासंदर्भात ग्रामसेविका छाया टाके यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, शौचालय लाभार्थींच्या आॅनलाईन यादीत गोविंद मुराळे यांच्या नावापुढे यस, असे नमूद आहे. तसेच ते शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांना शौचालयाचे अनुदान देता येत नाही, असे टाके यांनी स्पष्ट केले.

Web Title: Beneficiaries deprived of toilets subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.