मधमाशांचा हल्ला; पाच महिला जखमी!
By Admin | Updated: March 10, 2017 02:10 IST2017-03-10T02:10:18+5:302017-03-10T02:10:18+5:30
जांब येथील घटना; वाशिमच्या रुग्णालयात उपचार

मधमाशांचा हल्ला; पाच महिला जखमी!
मंगरुळपीर(वाशिम), दि. ९- हरभरा सोंगणी करीत असताना आग्यामोहळाच्या मधमाशांनी अचानक हल्ला चढविल्याने पाच महिला जखमी झाल्या. गुरुवार, ९ मार्च रोजी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जखमी महिलांवर वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, की शेतातील हरभरा पिकाची सोंगणी करीत असताना नजीक असलेल्या झाडाला आग्यामोहळ लागलेले होते. ज्या फांदीला हे मोहळ होते, त्याच फांदीवर माकडाने उडी मारली. त्यामुळे मधमाशा उठल्या आणि शेतात काम करणार्या महिलांवरच त्यांनी हल्ला चढविला. यात उषा बोथे, मंगला अव्हाळे, देवका काळे, जयश्री मोहटे, बेबी मोहटे या पाच महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर मंगरूळपीरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता त्यांची वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रवानगी करण्यात आली.