भाविकांवर मधमाशांचा हल्ला

By Admin | Updated: March 17, 2017 02:40 IST2017-03-17T02:40:05+5:302017-03-17T02:40:05+5:30

मधमाशांच्या हल्ल्यात पाच भाविक जखमी झाले.

Bees attack on devotees | भाविकांवर मधमाशांचा हल्ला

भाविकांवर मधमाशांचा हल्ला

उंबर्डा बाजार(वाशिम), दि. १६- अवधूत महाराज मंदिरावर १५ मार्च रोजी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गेलेल्या भाविकांवर दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग्या मोहळाच्या मधमाशांनी जोरदार हल्ला चढविला. मधमाशांच्या हल्ल्यात पाच भाविक जखमी झाले आहेत. उंबर्डा बाजार येथून जवळच असलेल्या अवधूत महाराज संस्थानवर भाविकांच्यावतीने १५ मार्चला उंबर्डा येथील काही भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी उंबर्डा बाजार येथील काही भाविक गेले होते. दरम्यान, दुपारी १२ वाजता आग्या मोहाच्या मधमाशांनी भाविकांवर अचानक हल्ला चढविल्याने पायल करडे, क्रीश करडे, पायल ठाकूर, ओम साव हे चार बालक व कुसूमबाई अवघड ही वृद्धा जखमी झाली.

Web Title: Bees attack on devotees