बियर बार, दारू दुकानांत २५ टक्केच ग्राहकांना बसण्याची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST2021-03-17T04:42:38+5:302021-03-17T04:42:38+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. दर दिवशी सरासरी १४० व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. ...

बियर बार, दारू दुकानांत २५ टक्केच ग्राहकांना बसण्याची मुभा
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. दर दिवशी सरासरी १४० व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंध लावले असून, त्यात बियर बार, दारू दुकानांत एकूण बैठक क्षमतेच्या केवळ २५ टक्के ग्राहकांनाच बसण्याची मुभा देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्चला सायंकाळी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंडसंहिता १८६०च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्याता आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.