दोन गटात मारहाण ; १५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:44 IST2021-05-11T04:44:06+5:302021-05-11T04:44:06+5:30

याबाबत आसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल भगत (रा. सनगाव) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ९ ...

Beating in two groups; Crime against 15 persons | दोन गटात मारहाण ; १५ जणांवर गुन्हा

दोन गटात मारहाण ; १५ जणांवर गुन्हा

याबाबत आसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल भगत (रा. सनगाव) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ९ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपी समाधान भोरे, प्रदीयुमल पातूरकर, प्रसाद भोरे, गणेश पातूरकर, विष्णू पातूरकर, शिवराम पातूरकर, सोनू पातूरकर यांनी पाणी भरण्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने पायावर, मांडीवर मारून जखमी केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी नमूद आरोपींवर कलम १४३, ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. दुसऱ्या गटातील फिर्यादी समाधान भोरे यांनी तक्रारीत म्हटले की, आरोपी विशाल भगत, रुपेश भगत, चेतन भगत, रोशन भगत, बाजीराव भगत, दत्ता भगत, सीताराम भगत, वसंता भगत यांनी लोखंडी रॉडने पायावर मारून जखमी केले व शिवीगाळ करून मारहाण केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपींवर ही कलम ३०७, ३२४, १४३, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Beating in two groups; Crime against 15 persons