दोन गटांत मारहाण; १० जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:44 IST2021-05-27T04:44:04+5:302021-05-27T04:44:04+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी गंगाराम शिंदे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपींनी क्षुल्लक कारणावरून ...

दोन गटांत मारहाण; १० जणांवर गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी गंगाराम शिंदे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपींनी क्षुल्लक कारणावरून वाद घालत अश्लील शिवीगाळ केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शे. ख्वाजा शे. गुलाब, अकील शहा समद शहा, शे. जमीर शे. गणी, संतोष दशरथ चोपडे आदींविरुद्ध भा.दं.वि.चे कलम १४३, १४७, १४९, ३२३, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या गटाकडून शे. ख्वाजा शे. गुलाब यांनी तक्रारी दाखल केली. त्यात नमूद केले आहे की, आरोपींनी नाहक वाद घालत संगनमत करून तथा बेकायदेशीर मंडळी जमवून अश्लील शिवीगाळ केली. मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून आरोपी तान्हाजी गंगाराम शिंदे, शिवाजी गंगाराम शिंदे, शंकर गंगाराम शिंदे, तानाजी तुकाराम शिंदे, संगीता तानाजी शिंदे आदींविरुद्ध भा.दं.वि.चे कलम १४३, १४७, १४९, ३२३, २९४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.