‘पेड न्यूज’ विषयी दक्षता बाळगा!
By Admin | Updated: September 21, 2014 22:40 IST2014-09-21T22:40:43+5:302014-09-21T22:40:43+5:30
वाशिम जिल्हाधिकारी कुळकर्णी यांचे आवाहन: ‘एमसीएमसी’ ची बैठक.
‘पेड न्यूज’ विषयी दक्षता बाळगा!
वाशिम : निवडणूक कालावधीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे होणार्या प्रचाराबारोबर पेडन्यूजसारख्या प्रकारांबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडून प्रचारासाठी छापण्यात येणार्या जाहिराती, फलक, पत्रके याच्या मजकूराचीही काटेकोरपणे तपासणी व्हावी, असे मत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मिडीया सर्टिफिकेशन अँन्ड मॉनिटरींग कमिटी (एमसीएमसी) च्या बैठकीत मार्गदर्शन करतांना कुळकर्णीे बोलत होते.
माध्यमांद्वारे होणार्या प्रचारावर लक्ष ठेवणे हे ह्यएमसीएमसीह्ण चे काम आहेच, त्याचबरोबर उमेदवारांकडून देण्यात येणार्या पेडन्यूजबाबतही या समितीला महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. उमेदवारांकडून देण्यात येणार्या जाहिराती, मतदारांना करण्यात येणारे आवाहन यामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबतही एमसीएमसीच्या सदस्यांनी सतर्क रहावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. निवडणूक कालावधीत प्रसिध्दी होणार्या प्रत्येक बातमीवर कमिटीच्या सदस्यांनी लक्ष ठेवून पेडन्यूजचे प्रकार उघडकीस आणावेत. याबाबत दैनंदिन अहवाल तयार करुन पेडन्यूजसारखे प्रकार घडल्यास पुढील कारवाईही तातडीने करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी केली.
सदर बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविक करुन मिडीया सर्टिफिकेशन अँन्ड मॉनिटरींग कमिटी स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला.