मूलभूत कर्तव्याला दैनंदिन जीवनात महत्त्वाचे स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:51+5:302021-08-27T04:44:51+5:30
२५ ऑगस्ट रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष न्या. शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ...

मूलभूत कर्तव्याला दैनंदिन जीवनात महत्त्वाचे स्थान
२५ ऑगस्ट रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष न्या. शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ संघ, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात आयोजित मूलभूत कर्तव्य आणि इतर कायदे या विषयावरील कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधीज्ञ संघाच्या अध्यक्ष ॲड. छाया मवाळ, सचिव ॲड. एन.टी. जुमळे व ॲड. जी.व्ही. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल, कल्याण कायदा या विषयावर ॲड. मवाळ यांनी मार्गदर्शन केले. ॲड. मोरे यांनी कामगारांसाठी असलेले विविध कायदे व तरतुदीबाबतची माहिती दिली. कार्यक्रमास जिल्हा विधीज्ञ संघाचे पदाधिकारी, सदस्य, न्यायिक कर्मचारी तसेच पक्षकारांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन ॲड. गीतांजली गवळी यांनी करून आभार मानले.