बाप्पा विराजमान..

By Admin | Updated: September 6, 2016 02:02 IST2016-09-06T02:02:21+5:302016-09-06T02:02:21+5:30

वाशिम जिल्ह्यात ६३९ ठिकाणी सार्वजनिक गणशोत्सव मंडळात श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली असून गणरायांचे जल्लोषात स्वागत झाले.

Bappa sirajam .. | बाप्पा विराजमान..

बाप्पा विराजमान..

वाशिम, दि. ५ : गेल्या एका महिन्यापासून आस लागून राहिलेल्या गणरायाची प्रतीक्षा अखेर संपली असून, सोमवारी घरोघरी विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचे थाटात स्वागत करण्यात आले. वाशिम जिल्ह्यात ६३९ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे.
गत आठवड्यांपासूनच बाप्पाच्या तयारीची लगबग सुरू होती. रविवारी रिसोड, वाशिम, कारंजा, मालेगाव, मानोरा व मंगरुळपीर बाजारपेठेत गणेशमूर्तींंंची खरेदी करण्याबरोबरच पुजेचे साहित्य, फळांची खरेदी, मिठाईच्या खरेदीसाठी भाविकांची गर्दी होती. वाशिम येथील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत सायंकाळी तर गर्दीमुळे वाहतूकही खोळंबली होती. ग्रामीण व शहरी भागात उत्सवाच्या पूर्वसंध्येला मंडप व प्रतिष्ठापनेची सर्व तयारी पूर्ण झाली होती.
सोमवारी सकाळपासूनच गणरायांची स्थापना करण्याची लगबग सुरू होती. वाशिम शहरातील नगर परिषद रोडस्थित असलेल्या बाजारपेठेतून गणेशभक्तांनी गणरायांच्या आकर्षक मूर्ती घेऊन वाजत-गाजत मिरवणूक काढली. यावर्षी मिरवणुकीत सैराट चित्रपटातील गाण्यांच्या संगीताची धूम असल्याचे दिसून आले. ह्यगणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.. यासह अन्य गाण्यांच्या धूनमध्ये गणेशभक्तांनी गणरायांची स्थापना केली.
जिल्ह्यात एकूण ६३९ गणेश मंडळांपैकी शहरी भागात जवळपास ३८0 गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. वाशिम शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक शहरात गणरायाचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक पर्वणी असते. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा शहर व ग्रामीण भागात गणेशभक्तांनी गणरायांचे जल्लोषात स्वागत केले. पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार, वाशिम शहर पोलीस स्टेशन ७१, ग्रामीण ५८, कारंजा शहर ५0, ग्रामीण ४८, मंगरुळपीर ५४, रिसोड ७0, मालेगाव ५१, मानोरा ६२, धनज ३३, आसेगाव ३६, जऊळका रेल्वे २८, अनसिंग ४९, शिरपूर जैन पोलीस स्टेशन अंतर्गत ४१ गणरायाची स्थापना करण्यात आली.

सामाजिक उपक्रमावर राहणार भर
गावात सामाजिक एकोपा कायम राहावा, तंटामुक्तीचे वारे वाहावे, यासाठी ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर राहणार आहे. जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याचा मानस जिल्ह्यातील गणेश मंडळ व गणेशभक्तांनी व्यक्त केला.

Web Title: Bappa sirajam ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.