कर्जवसुलीसाठी बँकांची कसरत!
By Admin | Updated: April 20, 2017 02:04 IST2017-04-20T02:04:18+5:302017-04-20T02:04:18+5:30
वाशिम : गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकऱ्यांना ७६७.८१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले; मात्र ही रक्कम वसूल करण्यासाठी सध्या बँकांना चांगलीच कसरत करावी लागत आहेत.

कर्जवसुलीसाठी बँकांची कसरत!
वाशिम : गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकऱ्यांना ७६७.८१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले; मात्र ही रक्कम वसूल करण्यासाठी सध्या बँकांना चांगलीच कसरत करावी लागत आहेत.
जिल्ह्यातील अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँक आॅफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकांनी मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचे वितरण केले. जुलै २०१६ पर्यंत विविध बँकांनी ९८ हजार ७२१ शेतकऱ्यांना ७६७.८१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले होते; मात्र मध्यंतरी नोटाबंदी आणि कर्जमुक्तीसाठी काँग्रेसने चालविलेल्या आंदोलनामुळे वसुलीला बहुतांशी ब्रेक लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
--