कनेक्टिव्हिटीअभावी बँक व्यवहार ठप्प
By Admin | Updated: June 20, 2017 13:15 IST2017-06-20T13:15:07+5:302017-06-20T13:15:07+5:30
कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मानोरा शहरातील सर्वच बँकांतील व्यवहार ठप्प असल्याचे दिसून येते.

कनेक्टिव्हिटीअभावी बँक व्यवहार ठप्प
मानोरा - कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मानोरा शहरातील सर्वच बँकांतील व्यवहार ठप्प असल्याचे दिसून येते.
शहरात दि. अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, भारतीय स्टेट बँक, वाशिम अर्बन बँक, जनता बँक, बुलडाणा अर्बन बँक, ढोकेश्वर मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक या बँकेच्या शाखा आहेत. १९ जून रोजी सर्वच बँकेत इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसल्याने ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागले. याची प्रचिती २० जून रोजीदेखील येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. सध्या पेरणीचे दिवस आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करावी लागत आहे. बँकेतून ह्यविड्रॉलह्ण घेण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, तांत्रिक कारणामुळे बँक व्यवहार विस्कळीत होत असल्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. बहूतांश बँकांना बीएसएनएलचे ब्रॉडबँड कनेक्शन आहे. अनेकदा ही सेवा विस्कळीत होत असल्याचा फटका बँकांना बसत आहे.