बँकेचे उंबरठे झिजवूनही मिळाले नाही व्यवसायासाठी ‘मुद्रा’चे कर्ज!
By Admin | Updated: May 2, 2017 00:40 IST2017-05-02T00:40:37+5:302017-05-02T00:40:37+5:30
वाशिम : व्यवसायासाठी मुद्रा कर्ज मिळावे, यासाठी गत वर्षभरापासून अलाहाबाद बँकेत चकरा मारूनही बँक अधिकाऱ्यांकडून नकारघंटा मिळाली.

बँकेचे उंबरठे झिजवूनही मिळाले नाही व्यवसायासाठी ‘मुद्रा’चे कर्ज!
वाशिम : व्यवसायासाठी मुद्रा कर्ज मिळावे, यासाठी गत वर्षभरापासून अलाहाबाद बँकेत चकरा मारूनही बँक अधिकाऱ्यांकडून नकारघंटा मिळाली. यामुळे कंटाळलेल्या मुरलीधर सोळंके नामक व्यक्तीने बँक अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी महाराष्ट्र दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
यासंदर्भात सोळंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या लेखी निवेदनात नमूद केले, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुद्रा’ योजनेतून व्यवसायासाठी कर्ज घेण्याच्या हेतूने नागठाणा येथील मुरलीधर जनार्दन सोळंके यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुनही गेल्या वर्षभरापासून त्यांना बँकेकडून कर्ज मिळाले नाही. या ना त्या कारणांमुळे कर्ज प्रस्ताव नाकारण्यात आला. या अन्यायाप्रती उपोषण करू, असे सोळंके यांनी प्रशासनाला कळविले होते. मात्र, त्याची दखल न घेतल्याने सोळंके यांनी आजपासून उपोषण सुरू केले.