कारंजा येथे बंजारा बांधवांचा तिजोत्सव उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST2021-09-09T04:49:23+5:302021-09-09T04:49:23+5:30

दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासाने व मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा बंजारा समाजातील तिजोत्सव हा या वर्षी अतिशय साध्या व सोप्या ...

Banjara brothers' Tijotsav celebrated with enthusiasm at Karanja | कारंजा येथे बंजारा बांधवांचा तिजोत्सव उत्साहात साजरा

कारंजा येथे बंजारा बांधवांचा तिजोत्सव उत्साहात साजरा

दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासाने व मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा बंजारा समाजातील तिजोत्सव हा या वर्षी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने वसंतराव नाईक सभागृहानजीकच समाजाचे पारंपरिक नृत्य करून साजरा करण्यात आला. नारळीपौर्णिमेला सायंकाळी तांड्याचे नायक यांचे घरी समाजातील तरुणी या जमतात व तिजची पेरणी करतात व त्यानंतर १० दिवस तिज अर्थात, ज्वारा पेरून कुमारिका मुली या दररोज सकाळ-संध्याकाळ पाणी टाकून तिजची पूजा करतात व गोकुळ अष्टमीला तिजेची तोडणी करतात. या कालावधीत मोठ्या झालेल्या ज्वाराची तोडणी झाल्यानंतर, विसर्जनाकरिता निघालेल्या मिरवणुकीत कुमारिका मुली व महिला या हातात ज्वाराच्या टोपल्या घेऊन मिरवणुकीत नृत्य करतात, परंतु या वर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून, तिजची मिरवणूक न काढता, समाजातील मुली व महिला यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सभागृह परिसरातच नृत्य केले, तसेच कारंजा तालुक्यातील गिर्डा येथेही बंजारा समाजाचा तिजउत्सव २२ ते ३१ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात आला. या उत्सवात गावातील, तसेच कारंजा शहरातील अनेक समाजबांधव सहभागी झाले होते.

Web Title: Banjara brothers' Tijotsav celebrated with enthusiasm at Karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.