बांगलादेशी युवकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By Admin | Updated: October 10, 2014 00:47 IST2014-10-10T00:47:41+5:302014-10-10T00:47:41+5:30

मेडशी येथील धारदार शस्त्रासह केली होती अटक.

Bangladeshi youths to be sent to judicial custody | बांगलादेशी युवकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बांगलादेशी युवकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

मालेगाव : मेडशी तपासणी नाक्यावर एस.टी. बसच्या तपासणीदरम्यान धारदार शस्त्रासह ताब्यात घे तलेल्या पाच संशयित बांगलादेशी युवकांची मालेगावच्या विद्यमान न्यायालयाने न्यायालयीन कोठडी त रवानगी केली. यापूर्वी या पाचही जणांना पोलिस कोठडी मिळाली होती. मालेगाव तालुक्यातील मेडशी तपासणी नाक्यावर पोलिसांनी मलकापूरहून नांदेडला जाणारी एम. एच. ४0 वाय ५७२२ क्रमांकाच्या एस.टी. बसची ५ ऑक्टोबर रोजी तपासणी केली असता पोलिसांना शस्त्रसाठा असलेली बेवारस बॅग आढळली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरून बांगलादेशातील पाच जणांना ताब्यात घेतले होते.

Web Title: Bangladeshi youths to be sent to judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.