शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी उभारले जाणार बलून बॅरेज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:36 IST

वाशिम : सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जिल्ह्यातील बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तरसावंगा येथे बलून बॅरेज उभारले जाणार.

ठळक मुद्दे बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तरसावंगा येथे बलून बॅरेजेस उभारण्याच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. प्रशासनाने उद्भवलेल्या त्रुटी दुर करून सदर सुधारित प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे सादर केला.पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यास संभाव्य नुकसान टाळण्याकरिता बलून बॅरेजेस अत्यंत फायदेशीर ठरतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जिल्ह्यातील बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तरसावंगा येथे बलून बॅरेज उभारले जाणार असून ५ जुलै रोजी नागपूरच्या विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करित उद्भवलेल्या त्रुटी दुर करून सुधारित प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.बांग्लादेश, आंध्रप्रदेश, मुंबई आदीठिकाणी उभारण्यात आलेल्या बलून बंधाºयांचा परिणामकारक फायदा दिसून आलेला आहे. त्या धर्तीवर सिंचन अनुशेष निर्मुलन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तरसावंगा येथे बलून बॅरेजेस उभारण्याच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, स्थानिक प्रशासनाने उद्भवलेल्या त्रुटी दुर करून सदर सुधारित प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे सादर केला असून तेथून तो नाशिक येथील राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजूरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काय आहे बलून बॅरेज!नदी अथवा सिंचन प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होवून पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यास संभाव्य नुकसान टाळण्याकरिता बलून बॅरेजेस अत्यंत फायदेशीर ठरतात. सिमेंट-काँक्रीटच्या फाऊंडेशनमध्ये फसवून हवा कमी-अधिक करण्याची सोय यात दिलेली असते. यामुळे पावसाचे पाणी अडविणे आणि संभाव्य धोका टाळणे हे दोन्ही उद्देश सफल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प