शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नादुरुस्त बस ठरताहेत जीवघेण्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:27 IST

सोमवारी वाशिममार्गे अकोलाकडे जाणाऱ्या बसचे मेडशी (ता.मालेगाव) या गावानजिक ‘ब्रेक’ निकामी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ४ एस.टी. आगार आणि २ उपआगार असून याअंतर्गंत २५० पेक्षा अधिक एस.टी. बसेस दैनंदिन रस्त्यावर धावतात; मात्र त्यातील अधिकांश बसेस नादुरुस्त राहत असून प्रवासादरम्यान बस बंद पडण्याच्या प्रकाराला प्रवासी पुरते वैतागले आहेत. सोमवारी वाशिममार्गे अकोलाकडे जाणाऱ्या बसचे मेडशी (ता.मालेगाव) या गावानजिक ‘ब्रेक’ निकामी झाले. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. याचदिवशी वाशिमच्या भर चौकात वाशिम-रिसोड ही बस नादुरूस्त झाल्याने प्रवाशांना दुसºया पर्यायी बसने प्रवास करावा लागला.‘प्रवाशांच्या सोयीसाठी’, हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाºया राज्य परिवहन महामंडळाचा कारभार मात्र जुन्याच एस.टी. बसेसच्या माध्यमातून सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरूळपीर हे चार आगार असून मालेगाव उपआगाराचा कारभार वाशिम; तर मानोरा उपआगाराचा कारभार मंगरूळपीर आगारातून चालतो. आजमितीस चारही आगारांकडे असलेल्या बहुतांश एस.टी. बसेस जुनाट झाल्या असून प्रवासादरम्यान टायर पम्चर होण्यासह अन्य स्वरूपात अचानक बिघाड होऊन बस मध्येच बंद पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वाशिममार्गे अकोलाकडे जाणाºया एम.एच. १४ बी.टी. ४७५८ या उमरखेड-शेगाव बसचे ‘ब्रेक’ मालेगाव तालुक्यातील मेडशी गावानजिक अचानक निकामी झाले. यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टीनशेडमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने या घटनेत एक प्रवासी जखमी होण्याचा अपवाद वगळता अन्य कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. याचदिवशी वाशिम आगारातून रिसोड येथे जाणारी एम.एच. ४० एन. ८९४३ या क्रमांकाची वाशिम-रिसोड बस पाटणी चौक ते आंबेडकर चौक मार्गावर भर रस्त्यात नादुरूस्त झाल्याने वाहकाने सर्व प्रवाशांना बसखाली उतरून दिले. मागून येत असलेल्या दुसºया बसचा पर्याय मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय टळली; मात्र यासारख्या घटनांमुळे एस.टी.च्या प्रवासाला नागरिक कंटाळल्याचा सूर सर्वच स्तरातून उमटत आहे.

१० ते १२ लाख किलोमिटर किंवा १० वर्षापर्यंत एस.टी. बस चालवावी लागत असल्याचा नियम आहे. आगारांतर्गत धावणाºया एस.टी. बसेसला आजमितीस १० वर्षे पूर्ण होत असून गत पाच वर्षांपासून नव्याने एकही बस मिळालेली नाही. त्यामुळे जुन्याच बसेसवर कारभार हाकावा लागत आहे. दुसरीकडे रस्ते प्रचंड खराब झाल्याने १ लाख किलोमिटर प्रवासानंतर बदलावा लागणारा टायर सद्या १० ते १२ हजार किलोमिटरपर्यंतच चालत असून कर्मचारीही हैराण झाले आहेत.- विनोद इलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी