बेबी केअर युनिट धूळ खात
By Admin | Updated: August 4, 2014 00:31 IST2014-08-04T00:31:33+5:302014-08-04T00:31:33+5:30
आरोग्य केंद्रातील बेबी केअर युनिट तज्ज्ञ डॉक्टरअभावी अद्यापही धूळ खात आहे.

बेबी केअर युनिट धूळ खात
मंगरुळपीर : नऊ वर्षांपूर्वी अकोला रस्त्यावरील प्रशस्त इमारतीत शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले. या आरोग्य केंद्रातील बेबी केअर युनिट तज्ज्ञ डॉक्टरअभावी अद्यापही धूळ खात आहे. या केंद्रांतर्गत अजूनही अधिकारी व कर्मचार्यांची काही पदे रिक्त आहे. शेलुबाजार आरोग्य केंद्रात बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला ह्यबेबी केअर युनिटह्णची व्यवस्था केली होती. मात्र सदर युनिट मागील चार वर्षांपासून धूळखात पडले आहे.