शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:37 IST

वाशिम : दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमून ...

वाशिम : दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमून तसेच जयंतीदिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजतादेखील एकत्र येऊन परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात. परंतु या वर्षी कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजण्यापूर्वी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

या वर्षी कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दरवर्षीप्रमाणे प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका जयंतीनिमित्त काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी पाचपेक्षा जास्त नसावी. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर, इत्यादी) पालन करून परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी.

कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने व दादर, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वेस्थानकांवरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने वाशिम जिल्ह्यातील सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर मुंबई येथे न जाता घरातूनच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

दरवर्षी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते; परंतु यावर्षी कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य, इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जयंतीनिमित्त करण्यात येऊ नये. त्याऐवजी कार्यक्रमाचे केबल नेटवर्कद्वारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पूर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू, इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेव स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याचे विशेष लक्ष देण्यात यावे.

राज्यातील कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.