सायकल रॅलीच्या माध्यमातुन महाकृषी अभियान कृषी ऊर्जा पर्वाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:27+5:302021-03-18T04:41:27+5:30
सायकल रॅलीच्या माध्यामातून "माझे वीजबिल माझी जबाबदारी" अभियान राबवून वीज बिल भरण्याचे आवाहन केले. माझे वीज बिल, माझी जबाबदारी ...

सायकल रॅलीच्या माध्यमातुन महाकृषी अभियान कृषी ऊर्जा पर्वाची जनजागृती
सायकल रॅलीच्या माध्यामातून "माझे वीजबिल माझी जबाबदारी" अभियान राबवून वीज बिल भरण्याचे आवाहन केले. माझे वीज बिल, माझी जबाबदारी अभियान सायकल रॅलीचे उद्घाटन हिरवी झेंडी दाखवून वाशिम मंडाळाचे अधीक्षक अभियंता विजय मानकर यांनी केले. या रॅलीमध्ये वाशिम विभागाचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. के. चव्हाण, प्रकाश ढंगारे, व्यवस्थापक कुणाल गजभिये यांच्यासह संघटनेचे अनेक पदधिकारी सहभागी झाले. वाशिम मंडळाची घरगुती, वाणिज्य, औद्योगिक ग्राहकांकडे ४९ कोटी, शेती पंपाची ६५० कोटी, पाणी पुरवठा योजनेची १० कोटी, स्ट्रिट लाईटची ८० कोटी थकबाकी असून एकूण थकबाकी ७८९ कोटी आहे. वीज बिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सायकल रॅलीच्या माध्यमातून "वीज बिल भरा महावितरणला सहकार्य करा, माझे वीजबिल माझी जबाबदारी" अशा स्वरुपाच्या घोषणांव्दारे वीज ग्राहकांना बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२०ची माहिती सर्व वाशिम जिल्हावासियांना देण्यात आली.