महा-कृषी-ऊर्जा अभियानाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:57 IST2021-02-26T04:57:07+5:302021-02-26T04:57:07+5:30
या अभियानांतर्गत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते धानोरा (वाशिम) येथील शेतकरी कमल इंगोले, मिर्झापूर (मालेगाव) येथील शेतकरी कमलाबाई सोमटकर, ...

महा-कृषी-ऊर्जा अभियानाची जनजागृती
या अभियानांतर्गत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते धानोरा (वाशिम) येथील शेतकरी कमल इंगोले, मिर्झापूर (मालेगाव) येथील शेतकरी कमलाबाई सोमटकर, कंकरवाडी (रिसोड) येथील शेतकरी उद्धव जाधव, सावळी (वाशिम) येथील शेतकरी बबन भगत, व्याड (रिसोड) येथील शेतकरी रंजना बोंडे आणि सावळी येथील शेतकरी गंगाधर पंडित यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी मागणीपत्र प्रदान करण्यात आले होते. तेव्हापासूनच अभियानाची जिल्ह्यात सर्वत्र जनजागृतीही सुरू करण्यात आली. शहरांसह ग्रामीण भागात ध्वनिक्षेपकाद्वारे महा-कृषी-ऊर्जा अभियानातील तरतुदी व फायद्यांबाबत उद्बोधन केले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
..............
कोट :
महा-कृषी-ऊर्जा अभियान शेतकऱ्यांसाठी सर्वांगाने फायदेशीर आहे. त्यामुळे या अभियानात सहभागी होऊन शेतकऱ्यांनी प्रगती साधावी. यानुषंगाने जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे.
- रत्नदीप तायडे
कार्यकारी अभियंता, वाशिम