शासकीय योजनांची जनजागृती थंडावली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST2021-05-12T04:42:32+5:302021-05-12T04:42:32+5:30
..--- डव्हा येथे दोन कोरोना रुग्ण वाशिम : मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण ११ मे रोजी ...

शासकीय योजनांची जनजागृती थंडावली !
..---
डव्हा येथे दोन कोरोना रुग्ण
वाशिम : मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण ११ मे रोजी आढळून आले. यापूर्वीदेखील डव्हा येथे कोरोना रुग्ण आढळून आले होते. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००००
ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना
वाशिम : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते; मात्र अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
०००००
तोट्यांअभावी पाणी वाया
वाशिम : येथील नागरिकांकडे नळ आहेत, परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे ओव्हर फ्लो झाल्यानंतर व पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते.
००००००
पदोन्नतीचा प्रश्न अजूनही प्रलंबित
वाशिम : जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये कार्यरत स्वच्छता कामगारांची शैक्षणिक पात्रता असताना काही ठिकाणी पदोन्नती देण्यात आली नाही, असा आरोप होत आहे. कर्मचाऱ्यांना पदोन्नतीअभावी केवळ स्वच्छता कर्मचारी म्हणून वर्षानुुवर्षे काम करावे लागत आहे.
—————————
निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत
वाशिम : मोकाट जनावरे पिकांचे नुकसान करतात तसेच रस्त्यावर बसत असल्याने वाहतूकही प्रभावित होते. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे.
..............
बीएसएनएलमधील रिक्त पदे तत्काळ भरा
वाशिम : जिल्ह्यातील अनेक दूरभाष केंद्रातील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे त्या सोडविण्यासाठी रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली जात आहे.
००००००००
पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील अनेक गावांतील जलकुंभ शोभेच्या वास्तू ठरल्या. पाणीपुरवठा योजना मंजूर असतानाही कामेच सुरू झाली नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर होत आहे.
००००००००००००
पार्डी येथे आरोग्य तपासणी
वाशिम : तालुक्यातील पार्डीटकमोर येथे आणखी ४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ११ मे रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात आहे.