ज्येष्ठा गौरी उत्सवातून कोरोना लसीकरणाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:50+5:302021-09-14T04:48:50+5:30
यंदा १२ सप्टेंबरला भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांच्या शुभमुहूर्तानंतर आगमन झाले. ...

ज्येष्ठा गौरी उत्सवातून कोरोना लसीकरणाची जनजागृती
यंदा १२ सप्टेंबरला भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांच्या शुभमुहूर्तानंतर आगमन झाले. विदर्भात याला महालक्ष्मी पूजन म्हणून संबोधल्या जाते. ज्येष्ठा नक्षत्रात पूजन होत असल्याने त्यांना ज्येष्ठा गौरीपूजन असे देखील म्हटले जाते. साधारणत: अनेक घरांत गौरी पूजन केले जाते. त्याअनुषंगाने कारंजा तालुक्यातील टाकळी येथील खाडे कुटुंबीयांनी ज्येष्ठा गौरीची स्थापना करताना कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करणारा देखावा साकारला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने शासन प्रशासनाकडून नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे तरीही ग्रामीण भागात मात्र आजही लसीकरणाविषयी अनेक गैरसमज असल्याने लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच ग्र्रामीण भागातील लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटावे म्हणून टाकळी येथील खाडे कुटुंबीयांनी गौरीपूजनानिमित्त लसीकरणाचे महत्त्व पटवून देणारी कलाकृती साकारली आहे.