सोयाबीन बियाणे उगवण शक्तीबाबत जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST2021-05-26T04:40:59+5:302021-05-26T04:40:59+5:30
शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांची बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. तसेच पेरणीपूर्वी बियाणांची उगवण शक्ती तपासून घ्यावी, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक ...

सोयाबीन बियाणे उगवण शक्तीबाबत जनजागृती मोहीम
शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांची बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. तसेच पेरणीपूर्वी बियाणांची उगवण शक्ती तपासून घ्यावी, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक आर. व्ही. सवणे यांनी केले आहे.
तालुका कृषी अधिकारी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात उगवण शक्ती तपासणीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या घरचे बियाणे पेरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासणे गरजेचे असल्याने, तालुका कृषी अधिकारी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात उगवण शक्ती तपासणीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार मानोरा तालुक्यातील कारपा परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बियाणांची उगवण शक्ती तपासून त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे मंडल कृषी अधिकारी व्ही. के. घोडेकर व कारपा येथील कृषी सहायक आरती नेमाडे यांनी मौजे कारपा, खांबाळा येथे उगवण शक्ती तपासणीबाबत व बीज प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणांची पेरणी करावी. गेल्यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली, त्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नात वाढ झालेली दिसून आल्याने तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी सुद्धा बीज प्रक्रिया कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी स्वतः किंवा गटामार्फत बीज प्रक्रिया सहित्य खरेदी करून बियाणांस बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन मानोरा तालुका कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.