शाैचालय वापराबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:46+5:302021-08-26T04:43:46+5:30
तिसऱ्या लाटेसाठी आराेग्य विभाग सज्ज वाशिम : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हा प्रभावी उपाय ...

शाैचालय वापराबाबत जनजागृती
तिसऱ्या लाटेसाठी आराेग्य विभाग सज्ज
वाशिम : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आराेग्य विभाग सज्ज असून आवश्यक त्या उपाययाेजना करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहीम ‘मिशन मोड’वर राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या हाेत्या.
वाहनचालकांची पाण्यातून वाटचाल!
वाशिम : स्थानिक अकोला नाका येथे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना पाण्यातूनच जावे लागत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन अकाेला नाका रस्त्यावरील साचत असलेल्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
वीजवाहिनीमुळे अपघाताचा धोका
वाशिम : कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे काही घरांवरून मुख्य वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. वीजवाहिनी घराच्या छतापासून अवघ्या दोन फूट उंचीवर असल्याने धाेका आहे.
अर्धवट मार्गावर अपघाताची भीती
वाशिम : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत वाशिम-कारंजादरम्यान एनएच १६१ ई या महामार्गाचे दस्तापूरनजीकचे काम अर्धवट आहे. वनविभागाच्या परवानगीअभावी हे काम थांबले.