कामरगाव येथे येथे पथनाट्यातून कोरोनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:50+5:302021-02-05T09:23:50+5:30
आयोजित कार्यक्रमात सामाजिक अंतर, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुवावेत, माझे कुटुंब, माझी जबाबदारी, महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना, ...

कामरगाव येथे येथे पथनाट्यातून कोरोनाबाबत जनजागृती
आयोजित कार्यक्रमात सामाजिक अंतर, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुवावेत, माझे कुटुंब, माझी जबाबदारी, महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना, शिवभोजन थाली, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, माझी कन्या भाग्यश्री, जननी सुरक्षा कन्यादान योजना, आंतरजातीय विवाह, स्वाधार योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, मुख्यमंत्री स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री मुद्रा लोन विविध योजनेची जनजागृती पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आली. या कार्यक्रमात कलावंत शाहीर संतोष खडसे, शाहीर भगवान कांबळे, अमोल वानखेडे, साहेबराव पडघान, ढोलकी वादक गौतम जोंधळे, संतोष कांबळे, गजानन खडसे, प्रकाश खडसे, आशिष खडसे, भगवान भगत व दिलीप कोल्हे सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित गावकऱ्यांना योजना व परिवर्तन घडीपत्रक तसेच पोस्टर वाटप करण्यात आले.