वासुदेवाची स्वारी मतदारांमध्ये करतेय मतदानाबद्दल जागृती

By Admin | Updated: October 2, 2014 01:07 IST2014-10-02T01:07:51+5:302014-10-02T01:07:51+5:30

वाशिम जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत अनोखा उपक्रम.

Awakening for voting in Vasudeva's constituency | वासुदेवाची स्वारी मतदारांमध्ये करतेय मतदानाबद्दल जागृती

वासुदेवाची स्वारी मतदारांमध्ये करतेय मतदानाबद्दल जागृती

वाशिम : जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तीनही मतदारसंघात म तदार जागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक यंत्रणेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गतच प थनाट्याद्वारे मतदार जागृतीवर सध्या विशेष भर देण्यात आला आहे. वारकरी सांप्रदायामध्ये विशेष महत्व असलेल्या वासुदेवाची पारंपारिक वेशभूषा धारण केलेला ह्यवासुदेवह्ण जिल्ह्यातील काही निवडक गावात जाऊन आगामी विधानसभा निवडणूकीत हिरीरीने मतदान करण्याचे आवाहन म तदारांना करीत आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व स्वीप कार्यक्रम समि तीचे सदस्य बाळासाहेब बोराडे यांनी दिली.
विधानसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभाग विशेष प्रयत्नशिल आहेत. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कलापथक त्यातीलच एक उपक्रम आहे. म तदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या या कलापथकात शाहीर धमार्नंद इंगोले, शाहीर प्रज्ञानंद भगत, शाहीर मधुकर गायकवाड, शाहीर निरंजन भगत आदींचा समावेश आहे. हे कलापथक जिल्हाभर जाऊन मतदार जागृतीचे काम करत आहे. १ ऑक्टोबर रोजी या पथकाने व अनसिंग, वाशिम शहर येथे मतदार जागृती कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. २ ऑक्टोबरपासून मेडशी, मालेगाव, शिरपूर, रिसोड तालुक्यातील रिसोड, रिठद, केशवनगर, केनवड, मंगळूरपीर तालुक्यातील शेलूबाजार, मंगळूरपीर, आसेगाव पोलिस स्टेशन, मानोरा तालुक्यातील मनोरा, शेंदूरजना आढाव, पोहरादेवी, इजोरी व कारंजा तालुक्यातही या कलाप थकाचे कार्यक्रम होणार आहेत.

Web Title: Awakening for voting in Vasudeva's constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.