पाण्यासाठी नागरिकांचे रात्रभर जागरण

By Admin | Updated: May 31, 2016 02:01 IST2016-05-31T02:01:48+5:302016-05-31T02:01:48+5:30

वाशिम येथील स्थिती : पाणीटंचाईचे संकट भीषण

Awakening for citizens for the night | पाण्यासाठी नागरिकांचे रात्रभर जागरण

पाण्यासाठी नागरिकांचे रात्रभर जागरण

नंदकिशोर नारे / वाशिम
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी प्रकल्पात मृत जलसाठा असल्याने शहराला पाणीपुरवठा होण्यास अडचण जात आहे. शहरात जाणवत असलेल्या पाणीटंचाई निवारणार्थ काही नगरसेवकांनी टँकरद्वारे मोफत सुरू केलेल्या पाणीपुरवठय़ासाठी नागरिकांना ह्यजागलह्ण करण्याची वेळ आली आहे. रात्री दीड ते पहाटे ३.३0 वाजेपर्यंत शहरात पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी जागरण करण्याची वेळ आली आहे.
वाशिम शहराला सुरुवातीला दररोज पाणीपुरवठा करण्यात आला. योग्य नियोजन न केल्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा संपला. सद्यस्थितीत ९ ते १0 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे तोही अनियमित. पाण्यासाठी नागरिक नगर परिषद, नगरसेवकांना धारेवर धरीत आहे. शहरातील काही भागातील नगरसेवकांनी स्वखर्चाने मोफत पाणी पुरवठा आपल्या भागात सुरू केला आहे. ज्या ठिकाणाहून नगरसेवक पाणी भरतात तेथेही मोठय़ा प्रमाणात टँकर राहत असल्याने पाणी भरण्यास विलंब होत आहे. यामुळे रात्री उशीर होत असतानासुद्धा नागरिक मात्र पाण्याची प्रतीक्षा करीत आहे त. २९ मे रोजी वाशिम शहरातील अकोला रस्त्यावरील वसाहत व अल्लाडा प्लॉटमध्ये रात्री उशिरा पाणी पाठविण्यात आले. योजना कॉलनीमध्ये रात्री दीड वाजता तर अल्लाडा प्लॉटमध्ये रात्री ३.३0 वाज ता टँकर पाठविले असता रात्रीही तेथे नागरिकांनी पाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात झुंबड केली होती. सद्यस्थितील नगराध्यक्ष लता उलेमाले, त्यांचे चिरंजीव नितीन उलेमाले, नगरसेवक राजू वानखेडे, नगरसेवक संतोष शिंदे, विद्या लाहोटी यांनी आपल्या प्रभागात टँकर सुरू केले आहेत. ते रात्री कितीही उशीर झाला तरी नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे कार्य करीत आहेत. इतरही नगरसेवकांनी पाणीटंचाईच्या काळात जनतेने आ पल्याला मतदान करून निवडून दिले. त्यांनी टँकर सुरू करून नागरिकांची तहान भागवावी, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Awakening for citizens for the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.