‘निगराणी समित्यां’ना प्रशिक्षणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:53+5:302021-08-23T04:43:53+5:30

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोननुसार प्रत्येक जिल्ह्यात शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती जवळपास पूर्ण झालेली आहे. बांधलेल्या शौचालयाचा वापर करणे ...

Awaiting training to ‘Monitoring Committees’ | ‘निगराणी समित्यां’ना प्रशिक्षणाची प्रतीक्षा

‘निगराणी समित्यां’ना प्रशिक्षणाची प्रतीक्षा

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोननुसार प्रत्येक जिल्ह्यात शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती जवळपास पूर्ण झालेली आहे. बांधलेल्या शौचालयाचा वापर करणे आणि उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणणे या उद्देशातून गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली निगराणी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. या समितीतील सदस्यांना जिल्हास्तर व पंचायत समिती स्तरावर प्रशिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रशिक्षण लांबणीवर पडले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने आता सर्वांना प्रशिक्षण मिळणे अपेक्षित आहे. निगराणी समितीलाच प्रशिक्षणाची गरज असल्याने ते उघड्यावरील शौचवारीला नियंत्रणात कसे आणतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Awaiting training to ‘Monitoring Committees’