सरासरी ७0 टक्के मतदान

By Admin | Updated: January 11, 2016 01:47 IST2016-01-11T01:47:58+5:302016-01-11T01:47:58+5:30

नगर पंचायत निवडणुका: उमेदवारांचे भाग्य मशीनबंद; आज मतमोजणी

Average 70 percent voting | सरासरी ७0 टक्के मतदान

सरासरी ७0 टक्के मतदान

मानोरा/मालेगाव: मानोरा व मालेगाव नगर पंचायत निवडणुकीत रविवारी सरासरी ७0 टक्के मतदान झाले. मालेगावात १७ हजार १६७ पैकी ११ हजार ९६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, याची टक्केवारी ६९.७0 आहे. मानोर्‍यात ७ हजार २0४ मतदारांपैकी ५ हजार ३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, टक्केवारी ७0 टक्के आहे. मानोरा व मालेगाव नगर पंचायत निवडणुकीसाठी एकूण ३५ मतदान केंद्रावर रविवारी मतदान झाले. मालेगाव येथे १७ जागेसाठी ९२ उमेदवार निवडणुकीत मैदानात होते. वार्ड एकमध्ये ६२४ पैकी ३४९ मतदान झाले असून, टक्केवारी ५५.९२ आहे. वार्ड दोनमध्ये ६७६ पैकी ५२२ मतदान झाले टक्केवारी ७७.२१ आहे. वार्ड तीनमध्ये ८५0 पैकी ७५३ मतदान झाले असून, टक्केवारी ६५.५ आहे.

Web Title: Average 70 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.