इच्छूकांकडून फोडाफोडीचे सत्र
By Admin | Updated: September 7, 2014 23:05 IST2014-09-07T22:52:28+5:302014-09-07T23:05:02+5:30
वाशिम विधानसभा लक्षवेध: अन्य पक्षातील असंतुष्टांवर डोळा, अर्थकारणही आले तेजीत.

इच्छूकांकडून फोडाफोडीचे सत्र
वाशिम : आगामी विधानसभा निवडूकीत विजयाच्या गावापर्यंंत पोहोचण्यासाठी बहुतांश पक्षाच्या इच्छूकांनी कंबर कसली आहे. साम, दाम, दंड व भेद या चतुसुत्रीचा वापरही यासाठी करण्यात येत असुन प्रत्येक राजकीय पक्षांतील नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून मतदार संघात आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न मुरब्बी उमेदवारांकडून केला जात आहे.
विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम प्रत्यक्ष घोषीत झाला नाही, मात्र इच्छूकांनी व पक्षाच्या पदाधिकार्यांनी निवडणूकीत विजय खेचून आणण्यासाठी व्युहरचना सुरू केनी आहे. यंदा प्रचाराला कमी दिवस मिळणार असल्यामुळे आता पासूनच इच्छूकांची धडपड वाढू लागली आहे. अशातच आपले कार्यकर्ते वाढविण्यासाठी पक्षातील काही इच्छूक मातब्बर व पक्षाच्या पदाधिकार्यांकडून नाराज कार्यकर्त्यांना भेटून सहकार्य करण्याची गळ घातली जात आहे. यात कार्यकतेर्सुध्दा भविष्याचा वेध घेत आणि उमेदवारांच्या विजयाची शक्यता लक्षात घेऊन आपली दिशा निश्चित करताना दिसत आहे.
वाशिम जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात उमेदवारांची यादी मोठी असली तरी कॉग्रस-राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी व भारतीय जनता पक्ष-शिवसेना- स्वाभिमानी शेतकरी संघटना- शिवसंग्राम- रिपाइं व राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीतच े खरी लढत होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात नेहमीच विकासाच्या मुद्यापेक्षाजात फॅक्टर प्रभावी ठरत असल्याचा इतिहास आहे. या निवडणूकीतही याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदार संघात ज्या समाजाचे प्राबल्य आहे त्या समाजातील काही पुढार्यांच्या गुप्त भेटी घेऊन मतदारांना आपणाकडे आर्कषित करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीची चांगली ताकत आहे. परंतु प्रत्येक पक्षात नाराजांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणूकीने सर्वच पक्षातील रूसवे फुगवे अधोरेखित केले होते. निवडणुकीच्या या युध्दात साम, दाम, दंड, भेद या शस्त्रांचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच जिल्ह्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र गुप्तपणे सुरू झाले आहे. प्रत्येक पक्षाचे काही असंतुष्ट व नाराज कार्यकर्ते गुप्तपणे विरोधकांशी हातमिळवणी करीत आहेत. सद्या उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येक इच्छूकाकडुन जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. यासाठी यांना कार्यकर्त्यांंची अधिक गरज भासत आहे. नेमकी हीच संधी कार्यकर्तेही हेरत असुन यामध्ये अ र्थकारणही चांगली भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक पक्षातील असंतुष्ट निवडणूक कॅश करण्यासाठी धडपडत आहे.
** वाशिम मतदार संघातील उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच कॉग्रेसच्या काही इच्छूकांनी पक्षाकडे निवेदन पाठवून निष्ठावान कार्यकर्त्यांंनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन ऐनवेळी पक्षात येणार्यांचा उमेदवारीसाठी विचार होऊ नये असेही या निवेदनात नमुद होते. त्यामुळे राजकारण गरम झाले होते.
** वाशिम मतदार संघातील उमेदवारी वरून भारतीय जनता पक्षातही चांगलीच खळबळ सुरू आहे. पक्षाच्या काही इच्छूकांनी परस्परांच्या विरोधात तक्रारबाजी सुरू केल्यामुळे सद्या राजकारण चांगलेच तापले आहे.