औरंगाबाद ब्रेवेट २०० कि.मी. सायकलिंगमध्ये वाशिमचा ‘नारायण’ राज्यात प्रथम
By Admin | Updated: November 14, 2016 17:17 IST2016-11-14T17:17:10+5:302016-11-14T17:17:10+5:30
औरंगाबाद येथे १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या २०० किलोमिटर सायकलिंग स्पर्धेत वाशिमच्या ‘नारायणन’ने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

औरंगाबाद ब्रेवेट २०० कि.मी. सायकलिंगमध्ये वाशिमचा ‘नारायण’ राज्यात प्रथम
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १४ - औरंगाबाद येथे १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या २०० किलोमिटर सायकलिंग स्पर्धेत वाशिमच्या ‘नारायणन’ने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत राज्यातील ३७ युवक सहभागी झाले होते.
औरंगाबाद येथे १३ नोव्हेंबर रोजी २०० किलोमिटर सायकलिंग स्पर्धेत संपूर्ण महराष्ट्रातून ३७ युवकांनी सहभाग घेतला होता यामध्ये वाशिम जिल्हयातील तीन युवकांचा समावेश होता. ही स्पर्धा १३ तास ३० मिनिटामध्ये पूर्ण क रायची होती. वाशिम येथील नारायण व्यास यांनी ही स्पर्धा तीन तास १० मिनिटात पूर्ण करुन राज्यात प्रथम येण्याचा बहुमन मिळविला. तसेच वाशिमधून सहभागी असलेल्याा मनिष मंत्री व चेतन शर्मा यांनी सुध्दा सदर स्पर्धा वेळेच्या आत पूर्ण करण्यास यश मिळविले. या स्पर्धेत राज्यस्तरावर वाशिम सायकलस्वार गृपचे नाव या युवकांनी झळकावले. ब्रेवेट ही स्पर्धा मूळ फ्रांन्स या देशातील असून भारतातील मोठमोठया शहरामध्ये या स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. या स्पर्धेत वाशिमच्या युवकांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.