'Audio clip' business in last fase due to high tech promotion! | हायटेक प्रचारामुळे ‘ऑडिओ क्लिप’ व्यवसायाला उतरती कळा !
हायटेक प्रचारामुळे ‘ऑडिओ क्लिप’ व्यवसायाला उतरती कळा !

- अरुण बळी

मालेगाव  :  सद्याच्या होत असलेल्या निवडणुका व त्यातील हायटेक प्रचारामुळे दोन पिढयांपासून करीत असलेल्या ‘ऑडिओ क्लिप’ व्यवसायाला उतरती कळा लागली असल्याची खंत येथील कलाकार विजय सावंत यांनी व्यक्त केली.
कोणतीही निवडणूक असली की पूर्वी माझ्या घरी, दुकानांवर मोठया प्रमाणात उमेदवारांचे प्रतिनिधी ‘वेटींग’वर राहायचे. आज अशी घडी आली आहे की, कोणी साधे विचारायला सुध्दा येत नाही. त्यामुळे आॅडिओ क्लिप तयार करुन देण्याचा व्यवसाय केवळ शहरात लागलेले सेल्स, नगरपंचायतच्यावतिने गावात देण्यात येणाºया सुचनेपुरताच मर्यादित राहिला असल्याची माहिती दोन पिढयांपासून आॅडियो क्लिप तयार करुन देण्याºया विजय सावंत यांनी दिली.
मालेगाव शहरातील विजय सावंत यांच्या दोन पिढयांपासून कोणतीही निवडणूक आली की उमेदवारांच्या आॅडियो क्लिप तयार करुन देण्याचा व्यवसाय आहे.
 याआधी उमेदवारांच्या प्रतिनिधींना आपल्याकडे वेळ  नाही म्हणून अकोला, अमरावती येथील कलांकारांजवळ पाठवावे लागत होते. आजच्या घडीला तेथील कलाकारांना विचारणा केली असता सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याचे दिसून आले. 
आॅडिओ क्लिप तयार करण्याचा धंदा दोन पिड्यापासून चालत आलेला आहे . त्या काळात आँडिओ क्लिप व्दारेच प्रचार होत असल्याने निवडणूकीच्या १५ दिवसाआधी पासून नंबर लागत होते,  तर चांगला आवाजाच्या कलाकारांना अकोला किवा वाशिम वरून बोलविला जाते होते. त्यामुळे कलाकाराना चांगलीच कमाई होत होती,  परंतू आताचा हायटेक प्रचारामुळे दोन पिढ्याचा व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. व उदरनिवार्हाचा प्रश्न उभा राहिला आहे . 


वेगवेगळीे गाणी वेगवेगली युक्ता वापरून आॅडिओ क्लिप तयार केली जात असल्याने त्यामुळे मतदारचे मनोरंजन , प्रबोधन ,  साध्या व सरळ  भाषेत असल्याने त्याचा प्ररिणाम अधिक दिसून येत होता.  सत्ताधारी यांनी केलेल्या कामाची महती तर विरोधकांनी त्यावर केलेला टिका यामुळे प्रचारात चागलांच कलगीतुरा रगंत होते. तसेच इतरापेक्षा आपली आॅडिओ क्लिप सरस असली पाहिजे यासाठी चागला आवाजाचा कलाकारांना किमंत त्या वेळी  मिळत होती व त्यावरच त्या कलाकारंचा उदरनिर्वाह चालत होता. परंतू हायटेक प्रचारामुळे अनेक कलाकार पडद्याच्या आड गेले.


Web Title: 'Audio clip' business in last fase due to high tech promotion!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.