महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष

By Admin | Updated: August 21, 2014 23:05 IST2014-08-21T23:05:50+5:302014-08-21T23:05:50+5:30

भाजपा, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लागली कामाला

Attention to the seat of the Mahayuti | महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष

महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष

वाशिम : वाशिम विधानसभा मतदार संघात यावेळी भाजपा, काँग्रेसमध्ये दुहेरी लढत होण्याची चिन्हे असून यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही कामाला लागल्याने तिहेरी लढतीचे संकेत प्राप्त झाले आहेत. गत निवडणुकीत या मतदार संघात दुहेरी लढत झाली होती. सद्याच्या स्थितीत तीनही पक्ष आपआपल्या परिने कामाला लागले आहेत. भाजपाकडे ताब्यात असलेला हा मतदार संघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने जबरदस्त फिल्डींग चालविली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याही बैठकी सुरू झाल्या असून तीनही मतदार संघात त्यांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे तर काँग्रेस सद्यास्थितीत सर्वच बाबतीत आघाडीवर दिसून येत आहे. काँग्रेसच्यावतिने इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती मुंबई येथे आटोपल्या आहेत. भाजपामध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असून पक्षातच आरोप प्रत्यारोपास सुरूवात झाल्याने उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. काँग्रेसचा येथे यापूर्वी पराभव झाल्याने हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे सोडण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतपर्फे सोडण्याची मागणी होत असून या मतदार संघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची यादी सुध्दा तयार झाली आहे. तसेच भाजपाकडे असलेल्या या मतदार संघावर शिवसेनेच्यावतिनेही दावा करण्यात येत आहे. या सर्व भानगडीमुळे महायुतीच्या जागा वाटपाकडे मतदार संघाचे लक्ष लागले असून भाजपाचा व काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार याची कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. वाशिम विधानसभा मतदार संघात १९९0 पर्यंत निर्विवाद काँग्रेसचे अस्तित्व होते त्यानंतर भाजपाने याला खिंडार पाडून सत्ता आपल्या ताब्यात घेतली. यानंतर मात्र पाळीपाळीने कॉंग्रेस- भाजपा ने निवडणुकीत विजय मिळविला. गत निवडणुकीत भाजपा उमेदवाराला काँग्रेसच्यावतिने जबरदस्त टक्कर देण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला होता. यावेळी सर्वच पक्षाच्यावतिने प्रबळ उमेदवार देण्याचे बोलल्या जात असल्याने सद्यातरी निवडणुक दुहेरी की तिहेरी होईल हे सांगता येत नसले तरी मतदारसंघातील वातावरण पाहता दुहेरी लढत होण्याची शक्यता आहे. मनसेचे इंजीन जोराने धावण्यास सुरूवात झाल्याने याचा परिणाम या निवडणुकीवर जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिपाइं आठवलेही निवडणूक लढण्यास इच्छूक असून त्यांनीही उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना वाशिम-मंगरुळपीर हय़ा राखीव मतदारसंघात काही पक्षात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अद्याप जागा वाटपाचेच बहुसंख्य इच्छुकांमुळे रेंगाळलेले दिसून येत आहेत. सन २00९ साली परिसीमन आयोगाने केलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघ संपुष्टात येउन नव्याने वाशिम-मंगरुळपीर या मतदारसंघाची निर्मिती झाली. तसेच सदरचा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता राखीव झाला असून यामध्ये इच्छुकांची गर्दी राजकीय पक्षांची डोकदुखी ठरत आहे. प्रसंगी स्वबळावर लढण्याच्या वल्गना दोन्ही काँग्रेसचे नेते करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा ठोकला असून राष्ट्रवादी कडे इच्छूक उमेदवार तयार आहेत. याचबरोबर मनसे, भारिप, भाजपा या पक्षांनीसुद्धा अद्याप त्यांचे उमेदवार घोषीत केले नसले तरी या पक्षातील इच्छूकांची संख्या मात्र सर्वच पक्षात मोठी दिसून येत आहे.सद्याच्या स्थितीत तीनही पक्ष आपआपल्या परिने कामाला लागले आहेत.

Web Title: Attention to the seat of the Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.