तलवारी बाळगणारा युवक अटकेत
By Admin | Updated: August 12, 2015 00:39 IST2015-08-12T00:39:28+5:302015-08-12T00:39:28+5:30
गुन्हेशाखेची कारवाई.

तलवारी बाळगणारा युवक अटकेत
वाशिम : शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेला सुरूंग लावण्याच्या उद्देशाने तलवारी विक्रीचा गोरखधंदा करणार्या एका युवकाला डीटेक्शन ब्रँचच्या पथकाने दोन तलवारीसह रंगेहात पकडले. ही घटना १0 ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान घडली. वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात एक युवक दोन तलवारी घेऊन शहरामध्ये प्रवेश करीत असल्याची माहिती ठाणेदार रविंद्र देशमुख यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर डीटेक्शन ब्रँचच्या पथकाला संशयीत युवकाच्या शोधकामी अकोला नाक्यावर रवाना केले. पोलिस पथकाने प्रफुल्ल उर्फ पफल्या नरेंद्र वाणी याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ दोन तलवारी आढळुन आल्या. आरोपी वाणी याचेविरूध्द शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. सदर कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक उदय सोयस्कर, राजेश बायस्कर, रमेश जायभाये, धनंजय अरखराव, मंगेश नरवाडे यांच्या पथकाने केली.