दाेन वर्षांच्या महत्प्रयासाने उभे राहिले अटल आनंद घन वन योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:45+5:302021-06-05T04:28:45+5:30
या प्रकल्पासाठी २५ बाय १० चा बेड तयार करण्यात आला असून, त्यात ७५० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. हा ...

दाेन वर्षांच्या महत्प्रयासाने उभे राहिले अटल आनंद घन वन योजना
या प्रकल्पासाठी २५ बाय १० चा बेड तयार करण्यात आला असून, त्यात ७५० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प जिल्हावासीयांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे .
स्थानिक एस. एम. सी. इंग्लिश स्कूल वाशीम येथे राष्ट्रीय हरित सेना, वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग वाशिमच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी अशा अटल आनंद घन वन योजनेंतर्गत एस. एम. सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, प्राचार्य मीना उबगडे, वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. आज हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, यात स्थानिक प्रजातीच्या ७५० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
या प्रकल्पाला एस. एम. सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, प्राचार्य मीना उबगडे, राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजित मुकुंदराव जोशी, पवन खंडेलवाल, राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी, सामाजिक वनीकरण विभाग वाशिमचे विभागीय वन अधिकारी एल. एम. पाटील, साहाय्यक वनसंरक्षक यु. म. फड, वनविभाग वाशिमचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, किशोर येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर, सामाजिक वनीकरणाचे वन परिक्षेत्र अधिकारी आर. जी. रत्नपारखी, जन्मेजय जाधव, मंगेश बाळापूर, शाळेतील माळी विशाल भंगी, बाळू मुऱ्हेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा प्रकल्प राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजित मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात आला आहे. तसेच रेनवाॅटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, नक्षत्र आणि राशी वन, सीड बँक, बहार रोपवाटिका अटल आनंद घन वन योजना प्रकल्प इत्यादी पर्यावरणात्मक प्रकल्प राबविण्यात आले आहेत.