रिसोड येथील अष्टविनायक गणेश
By Admin | Updated: September 5, 2014 23:58 IST2014-09-05T23:37:06+5:302014-09-05T23:58:47+5:30
३५0 वर्षापूर्वीचा रिसोड येथील अष्टविनायक गणेश

रिसोड येथील अष्टविनायक गणेश
रिसोड : येथील गणेश मंदिर शहरासह पंचक्रोशितील भाविकांचे ङ्म्रध्दास्थान आहे. ३५0 वर्षापूर्वीचे मंदिर असल्याची माहिती जाणकार या मंदिराविषयी माहिती देतांना देतात. प्राचिन व पुरातन असलेल्या या मंदिरातील गणेशजी भाविकांच्या नवसाला पावणारा असल्याचे हजारो भाविक मान तात.ङ्म्री गणेश मंदिराच्या गाभार्यामध्ये अष्टविनायकाचे मुर्तीची स्थापना आहे. यामध्ये विघ्नहर, महागणपती राजणगाव, गिरीजात्मक, चिंतामणी थेरुर, वरदविनायक बल्लळे पाली, सिध्दीविनायक सिध्दटेक व मयुरेश्वर मोरेश्वर यांचा समावेश आहे.गाभार्यातील शिल्पकलेचे रेखाटन व अष्टविनायक मुर्तीचे रंगकाम चित्रकार औंरगाबाद येथील देशपांडे यांनी केले आहे. गणेश चतुर्थीला संस्थानच्यावतीने धार्मिक कार्यक्रमाची रेलरेच असते. त्यामुळे मंदिरात दरदिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.शहरातील जैनगल्ली रोडवर जुन्या शहरामध्ये सदर गणेश मंदिर स्थित आहे.