आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांची उपासमार!

By Admin | Updated: June 2, 2017 01:16 IST2017-06-02T01:16:34+5:302017-06-02T01:16:34+5:30

आर्थिक अडचणी : तीन महिन्यांपासून वेतन थकले!

Ashram school workers starvation! | आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांची उपासमार!

आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांची उपासमार!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील आश्रम शाळेवर कार्यरत ३० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.
मुसळवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक व शिक्षकेतर मिळून जवळपास ३० पेक्षा अधिक नियमित कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला बँक खात्यात जमा होणे बंधनकारक आहे; परंतु मुसळवाडी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे फेबु्रवारी, मार्च, एप्रिल, अशा तीन महिन्यांचे वेतन थकविण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना गृहकर्ज, विमा हप्ते, मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे आणि वैद्यकीय उपचाराचा खर्च कसा करावा, असे प्रश्न सतावत आहेत. विशेष म्हणजे अमरावती आदिवासी विभागांतर्गत अनेक आश्रम शाळा कार्यरत असून, त्यापैकी बहुतांश शाळातील कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होते. त्यामुळे मुसळवाडी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी कार्यालयाकडून चौकशी करुन कर्मचाऱ्यांना आर्थिक विंवचनेपासून दिलासा द्यावा, अशी विधायक मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे.

Web Title: Ashram school workers starvation!