आसेगाव पोलिसांचे जुगार अड्डय़ावर छापे
By Admin | Updated: September 1, 2014 00:41 IST2014-09-01T00:38:34+5:302014-09-01T00:41:28+5:30
वाशिम जिल्ह्यातील चार गावांतील जुगार अड्डय़ावर छापे, सात आरोपींना अटक.

आसेगाव पोलिसांचे जुगार अड्डय़ावर छापे
वाशिम : गणेश उत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आसेगाव पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी चार गावांमध्ये छापे टाकले. यामध्ये पोलिसांनी गावठी दारू विक्रेते व जुगार्यांवर कारवाई करून सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मंगरूळपीरचे पोलिस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय वाळके यांच्या मार्गदर्शनात आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ढोके, पोलिस नाईक ज्ञानेश्वर राठोड, संजय घाटोळे, संदीप गायकवाड, रवी घरत, सुनील चव्हाण , साहेबराव मुकाडे यांचा समावेश असलेल्या पथकाने मोतसावंगा, देपूळ, काजळंबा व कळंबा बोडखे या पाच गावामध्ये छापे टाकले.
यामध्ये मोतसावंगा येथील गंगाराम रामुजी डाखोरे व बबन दत्तू पत्रे या दोघांकडे २५ लीटर गावठी दारू आढळून आली. देपूळ येथील सुरेश कुंडलीक गंगावणे याच्याकडे २0 लीटर देशी दारू आढळली. काजळंबा येथील गजानन गणपत लडबडे याच्याकडे देशी दारूच्या ४८ बाटल्या आढळून आल्या. कळंबा बोडखे शिवारामध्ये किशोर धर्मा पवार, सुभाष मोतीराम राठोड व मंगल किसन राठोड हे तिघे ५२ ताश पत्ता खेळताना आढळून आले. यामधील चार आरोपीकडून ५३00 रुपयांची देशी व गावठी दारू जप्त केली, तर जुगार खेळणार्या आरोपीकडून रोख ३५0 रुपये जप्त केले.
यामधील चार आरोपींविरुद्ध कलम ६५ ई अंतर्गत, तर तीन आरोपींविरुद्ध मुंबई जुगार अँक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या सातही आरोपींना अटक करण्यात आली. ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या अवैध धद्यांवर कारवाई करून अवैध व्यावसायिकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.