शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

Aryan Khan Drugs : ...अन् ज्ञानदेव वानखेडेंचं नामकरण 'दाऊद' झालं; समीर यांच्या काकांनी सांगितली गावातली गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 5:53 PM

समीर वानखेडेंचे मोठे काका म्हणजेच ज्ञानदेव कचरू वानखेडेंचे मोठे बंधू यांनीही ज्ञानदेव वानखेडे हेच समीरच्या वडिलांचं नाव असल्याचं स्पष्ट केलंय.

ठळक मुद्देनवाब मलिक यांनी जी हरकत घेतली ती चुकीची आहे. कारण, ज्ञानदेव हे कुटुंबीयांसमेवत नोकरीनिमित्त जेथे राहायला गेले, तेथे मुस्लीम एरिया असल्याने लोकांमध्ये त्यांचं येणं-जाणं होतं, उठणं-बसणं असायचं.

वाशिम - मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप करताना त्यांचे जन्म प्रमाणपत्रच जाहीर केले होते. त्यामुळे, वानखेडे आणि मलिक यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. आजपर्यंत शांत असलेल्या समीर वानखेडेंच्या वडिलांनीही आता नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर, आता त्यांच्या काकानेही मलिकांचा दावा फेटाळला असून ज्ञानदेव कचरू वानखेडे असंचे माझ्या भावाचं नाव असल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. 

समीर वानखेडेंचे मोठे काका म्हणजेच ज्ञानदेव कचरू वानखेडेंचे मोठे बंधू यांनीही ज्ञानदेव वानखेडे हेच समीरच्या वडिलांचं नाव असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच, आमचं मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुड तुफा हे असून पैनगंगेच्या तिरावर गाव वसल्याचंही त्यांनी सांगितलं. लहानपणापासून लग्नकार्यात, घरगुती कार्यक्रमात समीर गावाकडं यायचा. नवाब मलिक यांनी जी हरकत घेतली ती चुकीची आहे. कारण, ज्ञानदेव हे कुटुंबीयांसमेवत नोकरीनिमित्त जेथे राहायला गेले, तेथे मुस्लीम एरिया असल्याने लोकांमध्ये त्यांचं येणं-जाणं होतं, उठणं-बसणं असायचं. त्यावेळी, तेथील लोकांनी तुम्हाला दाऊद म्हटलं तर चालेल का असं म्हटलं होतं. तेव्हा दाऊद म्हणात, इब्राहीम म्हणा, काहीही म्हणा... मला काही देणंघेणं नाही, असे ज्ञानदेव यांनी म्हटल होतं, अशी आठवण त्यांच्या मोठ्या भावाने सांगितली आहे, ते निवृत्त शिक्षक आहेत. तसेच, ज्ञानदेव कचरू वानखेडे हेच त्यांचे मूळ नाव असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

नवाब मलिक यांचे आरोप फेटाळत समीर वानखेडे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे. माझे वडील हिंदू आहेत आणि आई मुस्लिम होती. माझी खासगी कागदपत्रे अशाप्रकारे ट्विटरवर टाकणे अपमानास्पद असल्याचे म्हणत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही झी 24 ताससोबत बोलताना नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. 

ज्ञानदेव वानखेडेंचं स्पष्टीकरण

माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे, माझं नाव दाऊद कसं झालं हे मला माहिती नाही. जावयाला आत टाकल्यापासून मलिक समीरच्या मागे लागलाय. तो मंत्री आहे, सरकारच त्याचं आहे, मग तो काहीही करू शकतो. नाव बदलू शकतो, जन्म दाखलाही बदलू शकतो, असे म्हणत ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या वर्तणुकीवर टीका केली आहे. 

समीर वानखेडेंचं लग्नाबाबत स्पष्टीकरण

महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या वैयक्तीक आरोपांमुळे मी दु:खी आहे. हे माझ्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचे उल्लंघन आहे, असे समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे राज्याच्या एक्साईज खात्यातून वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. ते हिंदू होते. माझी आई दिवंगत झहिदा ही मुस्लिम होती. मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे, मला याचा अभिमान आहे. मी 2006 मध्ये डॉ. शबाना कुरेशी हिच्याशी कायदेशीररित्या विवाह केला होता. तसेच 2016 मध्ये कायदेशीररित्या घटस्फोटही घेतला होता. 2017 मध्ये मी क्रांती दिनानाथ रेडकर हिच्याशी विवाह केला, असे वानखेडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (Aryan Khan Drugs Case) 

टॅग्स :washimवाशिमSameer Wankhedeसमीर वानखेडेMumbaiमुंबईnawab malikनवाब मलिक