शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी व चोरीतील आरोपी मुद्देमालासह जेरबंद

By admin | Updated: November 8, 2014 00:51 IST

वाशिम गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई ; मानोरा, कारंजा येथील चोरीची कबुली.

वाशिम : घरफोडी व चोरी करणार्‍या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केल्याची घटना ६ नोव्हेंबर रोजी घडली.मानोरा येथे दिवाळीच्या दरम्यान घरफोडीची व कारंजा येथून धाबेकर यांच्या सभागृहासमोरुन मोटारसायकल चोरीच्या घटना घडली होती. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारकाईने तपास सुरु केला. या घटनेबाबत पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेन्द्र पाटील यांनी त्यांच्या शाखेतील सहकारी पोलिस अधिकारी कर्मचार्‍यासह गुप्त बातमीदार नेमून आरोपी यांना ६ नोव्हेंबर पकडले. कारंजा व मानोरा येथील घरफोडी व चोरी प्रकरणातील आरोपी नामे रवि मारोती धोंगडे रा. मानोरा, शंकर शिवाजी पांडे रा. मानोरा व अनिल धोंडु मळघणे रा. कारंजा यांना सदर गुन्हय़ाबाबत त्यांचे घरुन ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सदर गुन्हय़ातील चोरीस गेलेले एकूण ११ मोबाईल व १ गुन्हयात वापरलेली मोटारसायकल त्यांचे ताब्यातून घेतली. त्याबाबत विचारपूस केली असता सदर मोबाईल हे मानोरा येथील मोबाईलचे दुकानातून चोरल्याचे व मोटारसायकल कारंजा शहरातून चोरुन नेल्याची कबुली दिल्याने आरोपीस मुद्देमालासह पोलिस स्टेशन मानोरा यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच त्यांच्याकडून वाशिम जिल्हय़ातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.