घरफोडी व चोरीतील आरोपी मुद्देमालासह जेरबंद
By Admin | Updated: November 8, 2014 00:51 IST2014-11-08T00:51:35+5:302014-11-08T00:51:35+5:30
वाशिम गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई ; मानोरा, कारंजा येथील चोरीची कबुली.

घरफोडी व चोरीतील आरोपी मुद्देमालासह जेरबंद
वाशिम : घरफोडी व चोरी करणार्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केल्याची घटना ६ नोव्हेंबर रोजी घडली.
मानोरा येथे दिवाळीच्या दरम्यान घरफोडीची व कारंजा येथून धाबेकर यांच्या सभागृहासमोरुन मोटारसायकल चोरीच्या घटना घडली होती. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारकाईने तपास सुरु केला. या घटनेबाबत पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेन्द्र पाटील यांनी त्यांच्या शाखेतील सहकारी पोलिस अधिकारी कर्मचार्यासह गुप्त बातमीदार नेमून आरोपी यांना ६ नोव्हेंबर पकडले. कारंजा व मानोरा येथील घरफोडी व चोरी प्रकरणातील आरोपी नामे रवि मारोती धोंगडे रा. मानोरा, शंकर शिवाजी पांडे रा. मानोरा व अनिल धोंडु मळघणे रा. कारंजा यांना सदर गुन्हय़ाबाबत त्यांचे घरुन ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सदर गुन्हय़ातील चोरीस गेलेले एकूण ११ मोबाईल व १ गुन्हयात वापरलेली मोटारसायकल त्यांचे ताब्यातून घेतली. त्याबाबत विचारपूस केली असता सदर मोबाईल हे मानोरा येथील मोबाईलचे दुकानातून चोरल्याचे व मोटारसायकल कारंजा शहरातून चोरुन नेल्याची कबुली दिल्याने आरोपीस मुद्देमालासह पोलिस स्टेशन मानोरा यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच त्यांच्याकडून वाशिम जिल्हय़ातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.