वर्षभरानंतर दाखल झाला आरोपींवर खूनाचा गुन्हा!

By Admin | Updated: May 13, 2017 18:39 IST2017-05-13T18:39:14+5:302017-05-13T18:39:14+5:30

पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब निष्पन्न झाल्याने १२ मे रोजी चोरद येथील दोन आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला.

Arrested after a year, crime against accused! | वर्षभरानंतर दाखल झाला आरोपींवर खूनाचा गुन्हा!

वर्षभरानंतर दाखल झाला आरोपींवर खूनाचा गुन्हा!

चोरद येथील घटना : मृतकाच्या आईला मिळाला न्याय
जउळका रेल्वे : गतवर्षीच्या जून महिन्यात नागपूर-औंरगाबाद महामार्गावरील गिव्हा फाट्यावर दुचाकीस्वार युवकास अज्ञात वाहनाने उडवून दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार मृतकाच्या आईने केली होती. त्यावरून पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब निष्पन्न झाल्याने १२ मे रोजी चोरद येथील दोन आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून २०१६ रोजी अज्ञात वाहनाची धडक लागून दीपक खंडारे (रा.चोरद) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध जऊळका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता; परंतू मृतकाच्या आईने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, पोलिसांनी चौकशी करून १२ मे रोजी चोरद येथीलच संतोष गुठे (वय ३२ वर्षे) व संतोष आंधळे (वय २२ वर्षे) या दोघांना अटक करून त्यांच्याविरूद्ध कलम ३०२, २०१ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. दोन्हीही आरोपींना १३ मे रोजी वाशिम येथील न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्यांना न्यायालयाने १५ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Arrested after a year, crime against accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.