सेना, भाजपचा आरोप-प्रत्यारोपावर, तर काँग्रेस, राकाँचा पक्ष संघटनेवर जोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:46 IST2021-09-06T04:46:02+5:302021-09-06T04:46:02+5:30

संतोष वानखडे वाशिम : सेना, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, काँग्रेस कार्यकारिणीत फेरबदल, राकाँच्या पक्ष निरीक्षकांकडून आढावा, आदी घटना, ...

Army, BJP's emphasis on rebuttal, while Congress, Rak's emphasis on party organization! | सेना, भाजपचा आरोप-प्रत्यारोपावर, तर काँग्रेस, राकाँचा पक्ष संघटनेवर जोर!

सेना, भाजपचा आरोप-प्रत्यारोपावर, तर काँग्रेस, राकाँचा पक्ष संघटनेवर जोर!

संतोष वानखडे

वाशिम : सेना, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, काँग्रेस कार्यकारिणीत फेरबदल, राकाँच्या पक्ष निरीक्षकांकडून आढावा, आदी घटना, घडामोडींमुळे राजकीय क्षेत्र चांगलेच चर्चेत आले आहे. आगामी नगर परिषद निवडणूक, जि.प. पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस, राकाँचा पक्ष संघटनेवर जोर असताना, सेना-भाजपतील कुरघोडीच्या राजकारणाने राजकीय क्षेत्र ढवळून निघत आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून जिल्ह्यातील यापूर्वीची युती, आघाडीचे समीकरणही बदलले आहे. जिल्ह्यातही महाविकास आघाडीतील काँग्रेस, राकॉँ आणि शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी धर्म पाळल्याचे दिसून येते, तर भाजपने प्रबळ विरोधक म्हणून विविध माध्यमातून रानही पेटविले आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यापासून भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने राजकीय क्षेत्र ढवळून निघत आहे. भाजपच्या तक्रारीवरून शिवसेनेच्या खासदाराशी संबंधित असलेल्या संस्थांची ईडीकडून चौकशी झाली तर शिवसेनेच्या तक्रारीवरून भाजप आमदाराशी संबंधित असलेल्या कॉम्प्लेक्सच्या बांधकामप्रकरणी चौकशी लागली. एकमेकांविरोधातील तक्रारीवरून चौकशी लागल्याने भाजप-सेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांमधील वादही विकोपाला जात असून, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने हा वाद कोणते नवीन वळण घेणार? याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे आगामी नगर परिषद, जि.प. पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष बदलून आतापासूनच कामाला लागण्याचा संदेशही दिला. जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर काँग्रेसच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीतही फेरबदल होणार असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत चढाओढ लागल्याचे दिसून येते. सर्व गटातटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना न्याय देऊन आगामी निवडणुकीत काँग्रेसला सन्मानजनक सदस्य संख्या मिळवून देण्यात नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांचा कस लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष निरीक्षकांना वाशिम जिल्ह्यात पाठवून तालुकानिहाय आढावा घेतला. पक्षात गटबाजीला थारा नसून पक्ष संघटन वाढविण्याबरोबरच आगामी निवडणुकीत राकाँ हा नंबर वन कसा ठरेल, असा संदेश वरिष्ठांनी दिला. एकंदरित प्रमुख चार पक्षांतील घटना, घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघत असल्याचे दिसून येते.

Web Title: Army, BJP's emphasis on rebuttal, while Congress, Rak's emphasis on party organization!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.