कारंजा येथे सशस्त्र दरोडा; २.८५ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST2021-09-08T04:49:50+5:302021-09-08T04:49:50+5:30
कारंजा : शस्त्राच्या धाकावर अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून २.८५ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना कारंजा शहरातील तुळशी विहार, ...

कारंजा येथे सशस्त्र दरोडा; २.८५ लाखांचा ऐवज लंपास
कारंजा : शस्त्राच्या धाकावर अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून २.८५ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना कारंजा शहरातील तुळशी विहार, शिंदे कॉलनी येथे सोमवार, दि. ६ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिल विरुदेव कोळकर (वय ३७) रा. तुळशी विहार शिंदे कॉलनी कारंजा लाड यांच्या फिर्यादीनुसार ते आई, पत्नी व मुलाबाळासह घरात झोपले असता अज्ञात चार दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, 'हम पोलीसवाले है, रेड करणे आये है, चुप बैठो', असे हिंदीत म्हणून मारहाण केली. चाकू दाखवून जिवाने मारण्याची धमकी दिली. घरातील सोने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम द्या, असे धमकाविल्याने सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २.८५ लाखांचा ऐवज अज्ञात दरोडेखोरांनी लंपास केला. या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३९२, ४५२, १७०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील खंडारे व चमू करीत आहे, तसेच फिंगर प्रिंट व श्वानपथक यांनासुद्धा पाचारण करण्यात आले होते.
०००००
रात्रगस्त वाढविणे गरजेचे
कारंजा शहर व परिसरात अलीकडच्या काळात चोरीच्या घटना घडत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने रात्रगस्त वाढविण्यावर भर द्यावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे. चोरट्यांचा शोध केव्हा लागणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
००००
बाॅक्स
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
कारंजा शहरात ठाणेदार सोनवणे रुजू झाले तेव्हापासून शहरात या अगोदर तीन- चार दुकाने, ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री अनिल काकोडकर यांच्या घरी सशस्त्र दरोडा तसेच, त्याच दिवशी राजदीप कॉलनीतील संजय चव्हाण, संतोष राठोड आणि बालाजी कॉलनीमध्येसुद्धा काही घरे फोडली. त्यामुळे पोलिसांकडून या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष दळणा सारख्या सूर्या मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.