जलजीवन मिशन; सदस्यांना ऑनलाइन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:12+5:302021-08-01T04:38:12+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कक्षाच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा तयार करून सादर ...

जलजीवन मिशन; सदस्यांना ऑनलाइन प्रशिक्षण
मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कक्षाच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा तयार करून सादर करण्याबाबत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा, कारंजा आणि मंगरूळपीर पंचायत समितीअंतर्गत सरपंच, सचिव, मोटारपंप ऑपरेटर, जलसुरक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद वानखडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे, उपअभियंता सुनील बोरकर, अभियंता कुणाल तायडे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, भूजल तज्ज्ञ दंदे, पाणी गुणवत्ता सल्लागार अभिजित दुधाटे, मूल्यांकन व संनियंत्रण सल्लागार विजय नागे यांनी मार्गदर्शन केले.
०००००००
गाव कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश
राज्य शासनाने तयार केलेल्या ‘कोबो टुल’ या साधनाच्या आधारे गाव कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश दिले. याकरिता प्रपत्र भरून सादर करणे, त्याकरिता पूर्व नियोजन, नियोजननंतर करावयाची कामे इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र सोनोने, सुमेर चानेकर, प्रफुल्ल काळे, राम श्रृंगारे, रविचंद्र पडघान, पुष्पलता अफुणे, अमित घुले, प्रवीण पान्हेरकर, सुर्वे, कळणू शिंदे, समाधान खरात यांच्यासह तालुका स्तरावरील बीआरसी, सीआरसी, अभियंते यांनी विशेष सहकार्य केले.